चिपळूण : संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजमध्ये मेंटल हेल्थ डे

चिपळूण : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजमध्ये मेंटल हेल्थ डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका आदिती पटवर्धन यांनी केली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. कांचन मदार उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या सेक्रेटरी हर्षा वाघुळदे यांनी डॉ. कांचन मदार यांचे स्वागत केले. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वतःच्या आवडीचा एखादा छंद जोपासावा तसेच मेडिटेशन करावे, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजचे शिक्षक सोनाली सुर्वे, सुप्रिया माळी, सारिका वेळेकर आणि सहकारी अवंतिका जंगम, वृषाली मालप, मनेश भिसे, मयुरी शिगवण, प्रकाश पवार, पायल शिगवण यांची उपस्थिती होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 22/Oct/2024