रत्नागिरी शहरात दिव्यांग मुलांसाठी प्रथमच एका विशेष दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवार्थ फाउंडेशन च्या पुढाकाराने होत असलेल्या या कार्यक्रमाला ‘केसरिया दांडिया 2025’ असे नाव देण्यात आले आहे. या अनोख्या उपक्रमातून दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हा कार्यक्रम 24 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 2:30 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे युथ ऍक्टिव्हिटी सेंटर, मंगल मॅटरनिटी हॉस्पिटल (भोळे हॉस्पिटल) शेजारी, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे होणार आहे. रत्नागिरी शहरातील आणि आसपासच्या परिसरातील शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमासाठी वयाची कोणतीही अट नाही.
सहभागी विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास दांडिया आणि गरबा यासाठीचे पेहराव करून यावे, तसेच दांडिया खेळण्यासाठी स्टिक्स सोबत घेऊन यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची अधिक माहितीसाठी सेवार्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे (8975838181) आणि विशेष शिक्षिका सौ. प्रिया गांधी (7744088165) यांच्याशी संपर्क साधता येईल.













