BJP: रत्नागिरी भाजपतर्फे आज रक्तदान शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरी शहर भाजपकडून बुधवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवला जात आहे.

रत्नागिरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. आपल्या थोड्याशा प्रयत्नाने असंख्य रुग्णांना नवजीवन मिळेल, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 24-09-2025