Ratnagiri: मेर्वी येथील भगवती देवीचा नवरात्रोत्सव प्रारंभ

गावखडी : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भूतेवाडीतील येथील जागृत देवस्थान श्री भगवती देवीचा नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून प्रारंभ झाला आहे.

या उत्सवानिमित्त 22 सप्टेंबर 2025रोजी सकाळीच ठिक 9 वाजता देवीचे मुखवटे लावले. सकाळी 11 वाजता घटस्थापना करण्यात आली आहे. रात्री 7:30 वाजता देवीची आरती,रात्री 10 वाजता ग्रामस्थांचे भजन सादर करण्यात आले.

त्याचप्रमाणे दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी बलिदान दिवशी दुपारी ठिक 12 वाजता देवीची आरती, प्रसाद, रात्री 8 वाजता भगवती देवीचा गोंधळ ,आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याच्या दिवशी तोरणे बांधण्यात येणार असून देवीची पूजा , आरती सायंकाळी चार वाजता सोने लुटणे त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.

या सर्व कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून भगवती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मेर्वी भगवती देवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

मेर्वी भूतेवाडी येथील श्री भगवती देवी जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी असल्याने भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 24-09-2025