Ratnagiri: जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वाखाली १९, तर ४६ जणांची थेट नियुक्ती

रत्नागिरी : अनुकंपाधारक आणि लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य शासनाने केलेल्या भरतीमध्ये जिल्ह्यात महसूल खात्यात अनुकंपा तत्त्वाखाली १९, तर सरळ सेवेतून ४६ जणांना नियुक्ती मिळाली आहे.

शासनामार्फत राज्यात मोठ्या प्रमाणावर अनुकंपाधारक आणि लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठी भरती करण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागाने २२ ऑगस्ट रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. महसूल विभागात जिल्ह्यामध्ये अनुकंपाधारक 19 जणांना तर सरळसेवा अंतर्गत 46 अशा एकूण 65 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली येथील तहसीलदार कार्यालये, महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, येथे महसूल सहाय्यक, ग्राममहसूल अधिकारी अशा गट-क पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. गट-ड पदांची नियुक्ती संजय गांधी योजना शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, राजापूर, लांजा, गुहागर, संगमेश्वर, राजापूर तहसीलदार कार्यालय, निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी, खेड उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ही नियुक्ती देण्यात आली आहे.

सरळसेवा अंतर्गत ४६ महसूल सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 24-09-2025