खेड : शहरातील शासकीय गोदामाचे काम चार वर्षे रेंगाळले आहे. ६७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन दुरुस्तीचे काम कागदावरच आहे. ब्रिटिशकालीन गोदाम मुसळधार पावसात जमीनदोस्त झाले. तातडीची गरज असताना महसूल विभागाने कानाडोळा केला. कामासाठी निधी मंजूर झाला; पण आजतागायत त्याचा उपयोग झालेला नाही. हे नेमके कोणाच्या हलगर्जीपणामुळे, असा सवाल जनतेतून होत आहे. सद्यःस्थितीत रास्तदराचे धान्य शेजारच्या दुसऱ्या गोदामात ठेवले जात असले तरी जागा अपुरी पडते आहे.
धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे गरिबांसाठी असलेले धान्य साठवणेच अवघड झाले आहे. मंजूर निधी असूनही कामाला सुरुवात होत नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त होत आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 24-09-2025












