गुहागर : तळवली ग्रामदेवता मंदिरात श्री सुकाई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व इतर देवतांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम बुधवार दि. २३ व गुरुवार दि. २४ रोजी विविध कार्यक्रमांनी होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात बुधवार दि. २३ रोजी दुपारी रोजी दुपारी १ ते ३ सहाण ते श्री सुकाईदेवी मंदिरापर्यंत मिरवणूक, दुपारी ३ वाजता मूर्ती स्नान व इतर विधी त्यानंतर मूर्ती निद्रावस्थेत ठेवणे, गुरुवार दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामदेवता श्री सुकाई देवी व इतर देवता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पूजा-अर्चा आरती तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, श्री सुकाई देवीची मूर्ती संध्याकाळी ७ ते ९ वा. हरिपाठ, रात्री ९ ते १० वा. भजन, रात्री १०.३० वा शक्ती तुरा डबलबारी सामना होणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सुकाई देवी ग्रामदेवता देवस्थान तळवली कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी ग्रामदेवता कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 22-10-2024