रत्नागिरी : रत्नागिरीत सोन्याचे १० ग्रॅमचा दर १ लाख १५ हजार रुपयांवर पोहचला आहे. या खरेदीवर वस्तू व सेवा कर वेगळा भरावा लागत असला तरी भविष्यातील गुंतवणूक म्हणून ग्राहक ज्वेलर्स दुकानांमध्ये येत असल्याचे अमेय ज्वेलर्सचे मालक अमेय वीरकर यांनी सांगितले.
चांदीचा १ किलोचा दर ही १ लाख ४० हजारांवर पोहचला आहे. रत्नागिरी ज्वेलर्स दुकानांमध्ये ग्राहक सोन्याची नाणी आणि चोख सोने खरेदी करायला प्राधान्य देत आहेत. विवाह इच्छुकांची पावले सोन्या-चांदीच्या दुकानांकडे वळत आहेत. वाढलेल्या दरामुळे कमी प्रमाणात ही खरेदी होत असले तरी ग्राहकांचा ओढा समाधानकारक आहे. त्याचवेळी २२ कॅरेट सोन्याचा दरही १ लाख रुपयांच्यावर गेला असून जीएसटी वेगळा द्यावा लागत असल्याचेही अमेय ज्वेलर्स यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 24-09-2025














