देवरूख : बाजीराव पेशवे उद्यान – बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला हा मुख्य रस्ता दिवाळीपर्यंत तातडीने दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर व पंकज पुसाळकर यांनी दिली.
चोरपऱ्या ते बसस्थानक या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुख्यरस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मुख्यरस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन देवरुख शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आम. शेखर निकम यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देत चर्चा केली. याची दखल घेत चोरपऱ्या- पंचायत समिती ते एसटी बसस्थानक ते मशिद हा रस्ता दीपावली पर्यंत हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आ. निकम यांना निवेदन देताना शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर, बाळु ढवळे, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, बंडू जाधव, दीपक खेडेकर, रविंद्र लाड, पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 24-09-2025














