Navaratri : गोळपमध्ये २६ ला भजनाचा सामना

पावस: रत्नागिरी तालुक्यातील गोळपसडा येथील दुगदिवी नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजता भजनाचा जंगी सामना होणार आहे. २७ ला सायं. ५.३० वाजता गोंधळ, रात्री ७.३० वा. दिवटी नाचण्याचा कार्यक्रम, रात्री १० वा. गोंधळाची कथा. २८ ला सायंकाळी ४ वाजता हळदीकंकू, ६ वाजता होममिस्टर स्पर्धा, रात्री ९.३० वा. दांडियारास, २९ ला सायंकाळी ४.३० वा. पाककला

स्पर्धा व रांगोळी स्पर्धा होईल, ९.३० वा. दांडियारास, ३० ला सकाळी १० वा. होमहवन व कुमारीपूजन, रात्री १० वा. डान्स स्पर्धा, ११ वा. दांडियारास. १ ऑक्टोबरला दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. बक्षीस वितरण समारंभ, ११ वा. शक्तीतुऱ्याचा जंगी सामना होईल. २ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वा. मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम, ७ वा. आरती, रात्री ९.३० वा. दांडिया रास. ३ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वा. आरती, ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 24-09-2025