पावस ते गावखडी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : पावस ते गावखडी जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ६.५५ वा. करण्यात आली.

शांताराम जयराम घडशी (वय ४८, रा. कुर्णे घडशीगाव लांजा, रत्नागिरी) असे नाव आहे. महिला सहाय्यक पोलिस फौजदार साक्षी भुजबळराव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी संशयित हा दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना पावस ते गावखडी जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजुला नामजोशी फाटा कुर्धे येथील पिकअप शेडमध्ये दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 25/Sep/2025