दापोली : तालुक्यातील तेरेवायंगणी गावात बुधवारी (ता. २४) सकाळी सुमारे दापोली सातच्या सुमारास भटक्या कुत्र्याने एका वृद्धावर हल्ला केल्याची घटना घडली. गजानन पांडुरंग जाधव (वय ६८) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
जाधव हे सकाळी किराणा दुकानाकडे जात असताना अचानक कुत्र्याने त्यांच्यावर झडप घालून चावा घेतला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, तातडीने त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गावकऱ्यांनी तातडीने कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 25/Sep/2025














