पावस : लांजा तालुक्यातील गोळवशी-खांबडवाडी मित्रमंडळातर्फे शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी उत्सवाचे २८ वे वर्ष विविध सामाजिक, सांस्कृतिक, विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.
यामध्ये देवीचे आगमन, दैनंदिन पूजा-आरती, भजन याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, गुणगौरव, मनोरंजक खेळ, भजनाचे डबलबारी सामने, वेशभूषा स्पर्धा, महिलांचे कार्यक्रम, गरबा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 25/Sep/2025














