Chiplun : वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

चिपळूण : चिपळूण शहरातील वृद्धाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार २२ सप्टेंबरला दुपारी २ ते रात्री ९च्या दरम्यान घडला. याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सी. एम. नारायण (वय ६३) ते खंड येथे गणपती मंदिराजवळच्या युनिटी बिल्डिंगमध्ये राहत होते. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 25/Sep/2025