पावस : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गणेशगुळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात झाली. या ग्रामसभेला महिला, ग्रामस्थ मिळून सुमारे १३७ लोकांची उपस्थिती होती. या ग्रामपंचायतीची गेल्या अडीच वर्षांतील पहिलीच ग्रामसभा ग्रामस्थांच्या चांगल्या सहभागामुळे यशस्वी झाली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रसाद सुनील तोडकर होते.
ग्रामसेवक रजनी काचवे, ग्रामपंचायत सदस्या मंगला तोडणकर, सुषमा शिंदे, अश्विनी साळुंखे, अश्विनी शिंदे, रवी तेरवणकर, तलाठी शिल्पा मयेकर, पोलिस पाटील संतोष लाड, तंटामुक्ती अध्यक्ष विक्रम गुरव आदी उपस्थित होते.
या ग्रामसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. सभेनंतर सरपंच प्रसाद तोडणकर म्हणाले, ३० सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात घरपट्टी १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 25/Sep/2025














