रत्नागिरी : नवरात्रौत्सव सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगारासह विविध आगारांतून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रत्नागिरी आगारातून जिल्हांतर्गत प्राचीन देवीच्या मंदिरास भेट देण्यासाठी रत्नागिरी २, खेड असे तीन एसटी बसेसच्या बुकिंग झाल्या आहेत. आणखी एसटी बसेस बुकिंग होणार आहे. तसेच उर्वरित आठ आगारांतूनही नवरात्रौत्सवासाठी विशेष एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात नवरात्रौत्सवाची धूम सुरू आहे. दुसरीकडे तूळजापूरला आई भवानीच्या दर्शनासाठी भक्तांची ओढ सुरू झाली आहे. रत्नागिरीतून तुळजापूर, धाराशिव बसेस दररोज धावत आहेत. तसेच आता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मंदिरांत जावून भक्त दर्शन घेत असतात. त्यामुळे रत्नागिरी आगारासह विविध आगारांनी विशेष एसटी बसेसची सोय केली आहे. रत्नागिरी विभागातून रत्नागिरी २, खेडमधून एक एसटी बुक झाली आहे. प्रतिसाद वाढल्यास आणखी बसेस बुकिंग होणार असल्याचे सांगण्यात आले.
महिला, ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत सुरू आहे. २५ ते २८ या कालावधीत एस.टी. बसेस नवदुर्गा दर्शनासाठी धावणार आहेत. विविध आगारांतून वेगवेगळ्या वेळी या बसेस धावणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 25/Sep/2025














