रत्नागिरी : रत्नागिरीतील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सौरभ मलुष्टे मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सौरभ मलुष्टे यांच्या 1ऑक्टोबर रोजी येणाऱ्या वाढ दिवसानिमित्त शनिवार 27 सप्टेंबर रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथील शासकीय रक्तपेढी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता या रक्तदान शिबिराला सुरुवात होईल. दुपारी 1 वाजेपर्यंत ही रक्तदान शिबिर चालणार आहे. रत्नागिरीतील अधिकाधिक नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले असून रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी सुनील बेंडखळे 9028478344 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 25-09-2025












