रत्नागिरी : रत्नागिरीजवळील कुर्ली समुद्रकिनारी शनिवारी (ता. २०) स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय आणि भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा (इनकॉईस), गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि एसकेएसव्ही महाविद्यालयातर्फे ही मोहीम राबवण्यात आली.
या वेळी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर, लांजा येथील एसकेएसव्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण व तटरक्षक दलाचे अधिकारी, कुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच राधिका साळवी, ग्रामस्थ, विद्यार्थी, मच्छीमार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 25-09-2025














