चिपळूण : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सैनिकी मुलांचे वसतीगृह, चिपळूण येथे शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील वीर माता, वीर पिता, वीर नारी, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. हा कार्यक्रम शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच सैनिकांच्या त्याग आणि शौर्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 25/Sep/2025














