सावर्डे : बदलत्या हवामानामुळे शेतीत येणाऱ्या अडचणींवर मात करून व्यवसायात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पावले उचलली पाहिजेत, असा सल्ला गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इंद्रनील चव्हाण यांनी सांगितले होते.
मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी क्षेत्रातील व्यवसायावरील मार्गदर्शनात ते बोलत होते.
यावेळी इंद्रनील चव्हाण यांनी तरुणांनी शाश्वत शेतीत आपली भूमिका कशी पार पाडावी, व्यवसायातील जोखीम पत्करण्याची क्षमता कशी विकसित करावी आणि व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा, यावर मौल्यवान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका करिष्मा मनेर यांनी केले, तर डॉ. अपर्णा यादव यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 25/Sep/2025














