Teacher : जिल्ह्यातील ४२ विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ४२ विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन केले आहे. ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासननिर्णयानुसार ही कार्यवाही करण्यात आली. हे आदेश व शालार्थ आयडी प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्या हस्ते विशेष शिक्षकांना प्रदान करण्यात आली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सूचनेनुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या सहकायनि विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, दर्जेदार व सुयोग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी समायोजनाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना वेतनही लवकरच आदा केले जाणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश रानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षणविस्तार अधिकारी संदेश कडव तसेच सर्व विशेष शिक्षक उपस्थित होते. या निर्णयामुळे गेली १७ वर्षे शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांना न्याय मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 25/Sep/2025