Chiplun : चिपळूण जुना काळभैरव नवरात्रौत्सवास प्रारंभ

चिपळूण : शहराचे ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे नवरात्र महोत्सव सोमवारपासून सुरू झाला आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त २५ रोजी श्री हनुमान प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ पाग, रात्री १० वाजता श्री गांधारेश्वर प्रासादिक भजन मंडळ शंकरवाडी, २६ रोजी ललितापंचमी, सकाळी १० वाजता कुंकुमार्चन धार्मिक विधी, ११ वा. कुमारिका पूजन, विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप, सकाळी १० वाजता सप्तशती पाठ वाचन, सामुदायिक सहभाग श्री कात्यायनी महिला मंडळ, सायंकाळी ५ वा. श्री देवी कालिकामाता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप), रात्री ९ वा. श्री तुकारामबुवा जोगले प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ शंकरवाडी, रात्री ११ वाजता श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ (पाग) यांचा कार्यक्रम होईल.

२७ रोजी सायंकाळी ५ वाजता सहेली ग्रुपतर्फे पारंपरिक भोंडला, रात्री ९ वाजता श्री विश्वकेदार प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ चिपळूण, रात्री ११ वाजता श्री विठ्ठल प्रासादिक संगीत भजन मंडळ (पांचमाडकर खंड) चिपळूण, २८ रोजी श्री देव जुना काळभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी लक्ष्मी नारायण महिला मंडळ प्रस्तुत श्री देवी स्तवन, श्री सुक्त पठण, स्तोत्र, कवच, मंत्र जप, आरती, सायं. ५ वाजता वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत स्वरसखी, रात्री १० वाजता श्री देव हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ चिपळूण, २९ रोजी श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ, रात्री श्री मुरलीधर प्रासादिक संगीत भजन मंडळ, रात्री श्रीराम प्रासादिक संगीत भजन मंडळ, ३० रोजी उपलवास, सायं. ५ वाजता श्री स्वररत्न प्रासादिक महिला भजन मंडळ, रात्री ९ वा. भोई समाज प्रासादिक वारकरी भजन मंडळ चिपळूण, सकाळी ११ वाजता श्री माऊली प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळाचा भक्तिमय कार्यक्रम होईल.

१ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री देव घटी उठवणे, श्री देव कालभैरव-श्री देवी जोगेश्वरी, श्री देव केदार-श्री देवी जाखमाता, श्री देवी एकवीरा, श्री देवी भवानी, श्री कात्रादेवी, सायंकाळी ५ वाजता श्री गणेशवाडी, ग्रामीण झिम्मा फुगडी, रात्री श्री साई शंकर प्रासादिक संगीत भजन मंडळ, श्री सुकाई देवी प्रासादिक संगीत भजन मंडळ नाका चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

तसेच २ रोजी विजयादशमी (दसरा), दुपारी ३ वाजता श्रींचे सीमोल्लंघन, सोने लुटण्यासाठी श्रींची सवाद्य शाही मिरवणूक, यानंतर श्रींचा दर्शन सोहळा, सायंकाळी ६ वा. शिवकालीन युद्धकला सरिपट्टा खेळ होईल. सादरकर्ते श्री गणेश मित्र मंडळ (गणेशवाडी/मतेवाडी) रावतळे चिपळूण पुरस्कृत श्री काळभैरव सरिपट्टा ढोल झांज पथक आणि ओझरवाडी ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत शिवध्वनी ढोल, झांज पथक (ओझरवाडी) चिपळूण यांचे कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 25/Sep/2025