चिपळूण : सावर्डे ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांच्या प्रचाराचा फोडला नारळ

सावर्डे : सावर्डे येथील ग्रामदेवता श्रीदेव केदारनाथाला गा-हाणे घालून येथील ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सावर्डेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावर्डेतील खोत, गुरव, गावकर, मानकरी, सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, व्यापारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. केदारनाथ मंदिरापासून प्रचाराला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी, केदारनाथाचा आशीर्वाद निकम आहे. त्यामुळे भविष्यात परिवाराला ते एक लाखांनी विजयी होऊन मंत्री होतील असे सांगितले.

आ. शेखर निकम यांनी, सर्वांनी गाफील न राहता कामाला लागा. तुमचा आशीर्वाद आहेच. एक महिना माझ्यासाठी द्या. मी विकासासाठी पुढचे दिवस देतो, असे आवाहन केले.

यावेळी डॉ. अमोल निकम, केतन पवार, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. कृष्णकांत पाटील, बाबू चव्हाण, यशवंतराव चव्हाण, संजय चव्हाण, प्रदीप निकम, सरपंच समिक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, शांताराम बागवे, शौकत माखजनकर, अजित कोकाटे, विष्णूपंत सावर्डेकर, अजय नलावडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 22/Oct/2024