रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवडणूक दिनांक २५ सप्टेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार श्री. संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा सभापती निवडला गेल्याचा ऐतिहासिक क्षण घडला आहे.
नवीन सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या. महिलांनी मोठ्या उत्साहाने श्री. संदीप सुर्वे यांचे स्वागत केले आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.
महिला मोर्चाच्या या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी वातावरण लाभले.
या निवडीमुळे भाजपाला संघटनात्मक बळ मिळणार असून कृषी क्षेत्रातील कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:19 25-09-2025














