रत्नागिरी : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत २ ऑक्टोबरपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी समिती कार्यालयात त्रुटी पूर्ततेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीईटी, क्लॅट व जेईई इत्यादी परीक्षा दिल्या आहेत. त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती कार्यालयात अर्ज दाखल केला आहे; मात्र त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बारावी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या संबंधित महाविद्यालयामार्फत स्वीकारले जातील. पदविकेच्या तृतीय वर्षात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे जात पडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्जही स्वीकारले जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 25-09-2025














