Mumbai- goa highway : महामार्गावर मालवाहतूक टेम्पोचा अपघात; चालक गंभीर जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी भारतवाडी येथील कात कंपनीसमोर गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात मालवाहतूक टेम्पोचा चालक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेडवरून कशेडीकडे जाणारा मॅक्झिमो मालवाहतूक टेम्पो (एमएच ०८-००२१) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात चालक अमर महादेव देवळेकर (वय ४८, रा. खेड शिवतर रोड) गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्था नाणीजधाम यांची मोफत रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमींना प्राथमिक उपचारांसाठी खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 26/Sep/2025