रत्नागिरी : शहरातील गवळीवाडा येथील प्रौढाने किरकोळ कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. प्रदीप प्रकाश रजपूत (वय ४०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्याच्या नातेवाईकांनी तू आधी जेवून घे त्यानंतर तुला काय करायचे ते कर हा तगादा लावला होता.
त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने घराच्या हॉलमधील लाकडी वाशाला असलेल्या फॅनच्या हुकला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रदीपला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 26/Sep/2025














