रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रवाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. महेश रघुनाथ साळुंखे (वय ५५, रा. अशोकनगर, भांडूप-मुंबई) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वा. सुमारास निदर्शनास आली. महेश साळुंखे हे सिंधुदुर्ग एक्स्प्रेसने सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करत असताना बेशुद्ध झाले.
या बाबत रेल्वे पोलिसांनी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात कळवले. येथील रेल्वे पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणी करुन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेश साळुंखे यांना दुपारी २.३० वा. सुमारास मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 26/Sep/2025














