Chiplun : चिपळूण तालुक्यातील ३ हजार २३७ लाभार्थ्यांचे धान्य वितरण झाले बंद

चिपळूण : केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची उचल न करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील ३ हजार २३७ रेशन कार्डधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागांतर्गत रेशन कार्ड ई-केवायसीबाबत नवीन आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार कार्डधारकाने ई-केवायसी केली नाही आणिचिपळूणा अधिकाऱ्यांना तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर त्याचे नाव रेशन कार्डातून हटवले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

बनावट धान्य वाटपास आळा बसावा यासाठी हे पाऊल सरकारकडून उचलण्यात आले होते. यापूर्वी बनावट लाभार्थी हटवण्यासाठी बायोमेट्रिक ओळख आणि आधार लिंकचे काम हाती घेण्यात आले. रेशन कार्डवर नावे असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करण्यात आली. चिपळूण तालुक्यात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी एकूण ४१ हजार २८८ शिधापत्रिकाधारक आहेत. यातील प्रधान्याची ६ हजार २३६ शिधापत्रिकाधारक आहेत. ज्या लाभार्थ्यांनी सलग सहा महिने धान्याची उचल केली नाही तसेच ई-केवायसी केली नाही अशा ३ हजार २३७ रेशन कार्डधारकांचा धान्यपुरवठा शासनाने बंद केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 26/Sep/2025