Ratnagiri : निवळी येथे बेकायदेशीर दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वा. सुमारास करण्यात आली.

जयवंत जनार्दन रेवाळे (४२,रा. तळेकांटे रेवाळेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल लक्ष्मण कोकरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित हा बेकायदेशिरपणे आपल्या ताब्यात ९४० रुपयांची ९ लिटर गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 26/Sep/2025