रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली व रामराजे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन व ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रामराजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांनी भूषविले. निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना गट १- (पाचवी ते सातवी) विषय : मला आवडलेले पुस्तक प्रथम क्रमांक विनीत विनय राणे, जि. प. शाळा विरसई, रोख ५०० रु. द्वितीय क्रमांक नीरजा मनोज वेदक, जि. प. शाळा चंद्रनगर रोख ३०० रु., तृतीय क्रमांक वेदिका जितेंद्र चव्हाण, पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर, पालगड रोख २०० रु. अशी बक्षिसे देण्यात आली.
गट २ (आठवी ते दहावी) – विषय : वाचन प्रेरणा काळाची गरज. प्रथम क्रमांक पूर्वा सचिन जगदाळे ए. जी. हायस्कूल, दापोली रोख ७००रु., द्वितीय क्रमांक जान्हवी संदीप जामकर, पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर, पालगड रोख ५०० रु., तृतीय क्रमांक श्रीया संदीप दाभोळे, रोख ३०० रु. अशी बक्षिसे देण्यात आली.
गट क्रमांक ३ (अकरावी ते पंधरावी) विषय : मला भावलेले लेखक जयवंत दळवी. प्रथम क्रमांक ऋतुजा मंगेश माने, श्री रामराजे ज्युनिअर कॉलेज, रोख १००० रु., द्वितीय क्रमांक पूर्वा प्रदीप रोकडे, रोख ७०० रु., तृतीय क्रमांक पूजा संतोष नाचरे, ए. जी.हायस्कूल, रोख ५०० रु. अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण साहित्यप्रेमी व गझलकार सुदेश मालवणकर यांनी केले.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष सुनील कदम यांनी काव्यवाचन करून पुस्तकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. श्री रामराजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे यांनी पुस्तक वाचनसंस्कृती कशी कमी होत चालली आहे, हे स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व का आहे हे सांगितले. परीक्षक सुदेश मालवणकर यांनी निबंध लिहिताना लक्षात घ्यावयाच्या बाबींबद्दल मार्गदर्शन केले. कोमसापचे जनसंपर्क प्रमुख व लेखक बाबू घाडीगावकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या साहित्याची माहिती देऊन कोमसापचे साहित्य निर्मितीतील योगदान स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. अशोक निर्बाण यांनी वाचन वृद्धिंगत कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कुणाल मंडलिक, सहसचिव अरविंद मांडवकर, सदस्य राजेश पवार, अन्य पदाधिकारी, श्री रामराजे महाविद्यालयाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 22-10-2024










