चिपळूण : हळव्या भात पिकाची लोंबी पसरवताना पाऊस लागल्यामुळे भाताला लोंबी धरली नाही व महान पिकाचे भात आहे ते खाली पडले. पानतळ शेतीमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे काही ठिकाणचे भात कुजून गेले. यामुळे कोकणामधल्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तरी महाराष्ट्र शासनाने कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, कोकणामध्ये भात, नाचणी, वरी, तांदुळ ही पावसाळ्यात येणारी पिके आहेत. दुसरे कोणतेही शेतीमध्ये उत्पन्नाचे साधन नाही. तरी शासनाने यांची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. कोकणव्यतिरिक्त पिकाचे नुकसान झाले तर जे निकष लावले जातात व भरपाई दिली जाते त्याच पद्धतीने कोकणातील शेतीचे नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी.
कृषी तालुक्यातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शेताच्या बांधावर जाऊन चिपळूण तालुक्यामध्ये शेतीची पाहणी मुकादम यांनी केली. त्यांच्या समवेत माजी उपसभापती राजा भाऊ चाळके, खालीद पटाईत, माजी पोलिस पाटील दत्ताराम शिंदे, नीलेश कदम, अमित घडशी, योगेश कदम, जीवाजी कदम आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 26/Sep/2025














