Rajapur : सौंदळ येथे शेतकरी मेळावा उत्साहात

राजापूर : जागतिक बांबू दिनानिमित्त राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुप व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदळ येथे माजी सैनिक वासुदेव घाग यांच्या बांबू शेतात शेतकरी मेळावा झाला. यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी कृषी प्रभाकर आपटे, पाचल मंडळ कृषी अधिकारी अनंत भारती, सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, विस्तार अधिकारी प्रथमेश पाटील, बांबू अभ्यासक पाटलोबा पाटील व पितांबरी प्रायव्हेट लिमिटेडचे अॅग्रो एक्झिकेटिव्ह कुंजन साळवी यांनी हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड कशी उपयुक्त ठरणार आहे हे सांगून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन केले. राजापूर तालुक्यामध्ये माणगा व भोरबेट या स्थानिक बांबू जातींची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या बांबूला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून याच ठिकाणी विक्री व्यवस्थापन केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी मदत व मार्गदर्शन मी करेन, असे पाठलोबा पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी उपसरपंच खानबाबा, कोळवण खडी गावाचे सरपंच प्रवीण रहाटे, सौन्दळच्या पोलीस पाटील समृद्धी पाटील, पोलीस पाटील अनिल माळी, बांबू शेतकरी वासुदेव घाग, नामदेव घाणेकर, डॉ. मुकरी, शिवाजी मोरे, पांडुरंग गुरव, सुनील गुरव, अरुण मोरे, बांबू व्यापारी अशोक गुरव, किशोर लाड, हरिश्चंद्र मोरे, अब्दुलगणी लांजेकर, सदाशिव सरखोत, रोहित यादव, मनोहर पवार, बाबा गावकार, योगेश चोरगे, अब्बास गोलंदाज, रमेश दळवी, राहुल सावंत, नजीर गुडेकर, बांबू व्यापारी दिलीप जाधव, महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीराज, प्रल्हाद नारकर, नागेश बने, प्रतीक गुरव, नीलेश कुर्ले, मितेश मोरे, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 26/Sep/2025