Sangameshwar : डिंगणी-करजुवे मार्गावर ट्रक मातीत रुतल्याने वाहतूक विस्कळीत

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्रीपूल आंबेड येथून डिंगणी-करजुवे मार्गाकडे जाणऱ्या मुख्य रस्त्यावर बाराचाकी ट्रक वळवताना चिखलात रुतल्याने पूर्ण रस्ता बंद झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

या अपघातामुळे शास्त्रीपूल आंबेड येथून डिंगणी-फुणगूस पुलामार्गे गणपतीपुळे व जयगडकडे जाणारी वाहतूक राष्ट्रीय महामार्गवरून वळवण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर चिखलात बाराचाकी मोठे वाहन रुतल्याने पूर्ण रस्ता बंद झाला. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. जेसीबीद्वारे चिखलात रुतलेली गाडी बाहेर काढण्यात आली. तोपर्यंत या मार्गावरून कोंड्ये, डिंगणी, करजुवे या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस जाण्यास अडथळा निर्माण झाला होता आणि या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 26/Sep/2025