खेड : शहरातील बाजारपेठेत असलेल्या मारुती मंदिराजवळील वाळंज गल्लीमध्ये पिताश्री इमारतीच्या तळमजल्यातील खोलीमध्ये पैसे लावून तीनपत्ती जुगार खेळत असताना रंगेहात मिळून आलेल्या चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस हवालदार महेश महेंद्र जाधव यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी संशयित जितेंद्र वसंत घोडे (५५, रा. कोष्टीआळी, खेड), संतोष भिकू शिगवण (५२, रा. तिसे शिगवणवाडी, ता. खेड), सतीश शंकर इंगवले (४२, रा. शिवाजीनगर, खेड) व संतोष नारायण शिगवण (५६, शिवाजीनगर, महाडनाका, खेड) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 26/Sep/2025














