Chiplun Teacher : चिपळूण तालुक्यातील सात शिक्षकांचे समायोजन

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषदेने विशेष शिक्षकांना न्याय देण्याच्यादृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिह्यातील ४२ विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन करण्यात आले आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी पालकमंत्री सामंत यांचे आभार मानले. या शिक्षकांचे वेतन लवकरच अदा केले जाणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. या समायोजनामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व सुयोग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. हा महत्त्वाचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाला आहे.

हे समायोजन १५ जुलै २०२५ ला पूर्ण झाले आणि २२ सप्टेंबर २०२५ ला विशेष शिक्षकांना या संदर्भातील आदेश व आयडी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या शिक्षकांनी आपला अनुभव आणि कौशल्याचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन लोहार यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 26/Sep/2025