चिपळूण : अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या येथील वाशिष्ठी डेअरीने मुंबई व ठाणे पाठोपाठ नवी मुंबईतही एन्ट्री केली. नवी मुंबईतील कामोठे येथे वाशिात डेअरीच्या शॉपीचे ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यासह नवी मुंबईतील मान्यवर उपस्थित होते.
वाशिष्ठी डेअरीने यापूर्वी मुंबई, ठाणे परिसरात कळवा, डोंबिवली, दहिसर आणि घाटकोपर येथे वाशिष्ठी डेअरीची शॉपी सुरू केली आहे. नवी मुंबईत वाशिष्ठी डेअरीची शॉपी सुरू व्हावी, अशी मागणी होत होती. नवी मुंबईतील कामोठे परिसरात असणाऱ्या कोकणवासियांना शॉपी सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 26/Sep/2025














