मंडणगड : मंडणगड तहसील कार्यालयातील महसूल विभागातर्फे सेवा पंधरवड्यांतर्गत पंदेरी गावातील आदिवासीवाडी येथील नागरिकांसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. यामध्ये रेशनकार्ड, आधारकार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नदाखला, कृषी विभाग अॅग्रीस्टिकसारखे विविध शासन योजनांचा लाभ देणाऱ्या सेवा देण्यात आल्या.
पंदेरी आदिवासीवाडी येथील विशेष शिबिरात नागरिकांना उत्पन्नदाखले अर्ज ६, जातींचे दाखले अर्ज २७, नवीन शिधापत्रिका अर्ज ३, शिधापत्रिकेवरून नाव कमी करणे ४ अर्ज, शिधापत्रिका ई-केव्हायसी ३५ अर्ज, आयुष्मान आरोग्यकार्ड ऑनलाइन १६ अर्ज, वारसतपास ३ अर्ज, पीएम किसान २ अर्ज दाखल करत दाखल्याची मागणी करण्यात आली. परिपूर्ण अर्जाना शिबिराच्या ठिकाणी दाखले प्रदान करण्यात आले. उर्वरित अर्जातील त्रुटी दूर करून लवकर दाखले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी मेहनत घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 26/Sep/2025














