मंडणगड : मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोटे (ता. खेड) येथे पदयात्रा काढली.
प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी फेरीचा प्रारंभ करत स्वतः डोळे बंद करत हातात पांढरी काठी घेऊन फेरीत सहभाग घेतला.
लोटे प्राथमिक शाळेतून सुरू झालेल्या फेरीचा समारोप परशुराम महाविद्यालयातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात झाला.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून डॉ. चित्रा बाविस्कर लिखित प्रतिभा सेनगुप्ता रूपांतरित दोन पुस्तकांचे प्रकाशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत पवार, डॉ. अलमान यांच्या हस्ते करण्यात आले. आयुष विभागातर्फे सर्व मुलांना बालसुरक्षा कीट देण्यात आली.
यावेळी लोटे रोटरी क्लबचे अध्यक्ष शशांक रेडीज, विजय मोरे, घाणेखुंट सरपंच राजू ठसाळे, लोटे रोटरॅक्ट क्लबचे सर्व पदाधिकारी, अंध विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष उत्तमकुमार जैन, सचिव संदीप सुखदरे, मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 22-10-2024












