साखरपा : नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर येथील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका अनुष्का जोयशी यांच्या इंग्लिश स्पिकिंग कोर्स या पुस्तकाचे प्रकाशन झाले, या वेळी डाएटच्या अधिव्याख्याता दीपा सावंत या उपस्थित होत्या.
जागतिक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही भाषा अवगत व्हावी आणि तिच्यातून संभाषण कला करता यावी, या उद्देशाने शाळेच्या शिक्षिका जोयशी यांनी इंग्लिश स्पिकिंग कोर्स हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई यांनी जोयशी यांना विशेष प्रोत्साहन दिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी शाळेत झाले. कार्यक्रमाला अनंत शेडे, राजेश कोळवणकर, सुधीर कांबळे, सुधीर संसारे, आजी-माजी संचालक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, अनुष्का जोयशी यांचे कुटुंबीय, उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 26/Sep/2025














