महिलांनी आरोग्य तपासणी मोहिमेत सहभाग घ्यावा : डॉ. नितीन अंबाडेकर

रत्नागिरी : सर्व महिला व मातांना आरोग्य तपासणी मोहिमेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि आरोग्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सर्व सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले.

केंद्र आणि राज्यशासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी २ ऑक्टोबरला स्वस्थ नारी, सशक्त परिवार विशेष अभियान राबवले आहे. या शिबिरामार्फत महिलांसाठी आरोग्य तपासणी, उपचार, समुपदेशन सेवा मोफत पुरवल्या जात आहेत. खानू प्राथमिक आरोग्यकेंद्रात आयोजित स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान शिबिराला संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्यसेवा कोल्हापूर उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी भेट दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 26/Sep/2025