रत्नागिरी : सेवा पंधरवडा अभियानातंर्गत तहसिलदार कार्यालयाच्या स्तरावर दाखल झालेली 70 ब कुळाची दावा प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता लोक अदालत मोहिमेच्या धर्तीवर महसूल लोक अदालत 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता तहसिलदार कार्यालय, दापोली येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित पक्षकारांनी आपसातील तडजोडीनुसार किंवा स्वसंमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी दाव्यातील सर्व पक्षकार यांनी स्वतः किंवा आपल्या विधिज्ञांमार्फत 28 सप्टेंबर 2025 पर्यंत लिखीत स्वरुपात निवेदन तहसिलदार दापोली यांचे कार्यालयात सादर करावे, असे तहसिलदार अर्चना बोंबे यांनी कळविले आहे.
सदर प्राप्त झालेली निवेदने 30 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या महसूल लोकअदालतीमध्ये निकाली काढण्याच्या कार्यवाहीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपल्या दावा प्रकरणांच्या तडजोडीबाबत तपशिलवार निवेदन सादर करुन सदर महसूल अदालतीमध्ये सर्व संबंधित पक्षकारांनी स्वतः हजर राहुन 70ब कुळाचे दावा प्रकरणांचा जास्तीत जास्त निपटारा होईल यासाठी सहकार्य करावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 26/Sep/2025











