Chiplun : लोकमान्य वाचन मंदिराच्या आदर्श वाचक पुरस्कारांचे रविवारी वितरण

रत्नागिरी : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श वाचक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी, दि.२८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

यावर्षीचे वाचक पुरस्कार वाचनालयाचे सभासद श्रीकांत फडके, वैभव खेडेकर, वीणा सावंत, सुलोचना खातू यांना जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण समारंभात नुकतीच विद्यावाचस्पती ही पदवी मिळवलेले डॉ. प्रतीक विनायक ओक यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण आणि सत्कार सोहळा वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिपळूणचे आमदार आणि वाचनालयाचे हितचिंतक शेखर निकम यांच्याहस्ते होईल. प्रतीक ओक पीएच.डी.साठी निवडलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमता’ या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे व्याख्यान देणार आहेत. प्रतीक हे वाचनालयाच्या संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक आणि सहकार्यवाह विनायक ओक यांचे सुपुत्र आहेत.

या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, वाचनप्रेमी आणि वाचनालयाच्या हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाच्या कार्यक्रम समितीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 26-09-2025