खेड : भाजप खेड शहराची नवीन कार्यकारिणी शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी नुकतीच जाहीर केली तसेच संबंधितांना नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खेड येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली गेली. जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर केली गेली. भाजप खेड शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष कानडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नव्या कार्यकारिणीमुळे पक्षसंघटन आणखी मजबूत होईल. आगामी राजकीय वाटचालीत प्रत्येक पदाधिकारी जबाबदारीने काम करेल.
या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष आबासाहेब जोशी, संजय बुटाला, ॲड. मिलिंद जाडकर, शरद सोहनी, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शशांक सिनकर, नितांत तलाठी, मृत्युंजय मोडक, माधव जोशी, विजय बेंदरकर, संजय खेडेकर, विजय गुप्ता, राजू केळकर, जयंत बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 26-09-2025














