Khed BJP : भाजपाच्या रक्तदान शिबीरात १२५ जणांचे रक्तदान

खेड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि भाजपा दक्षिण मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम हॉस्पीटल लोटे, खेड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उ‌द्घाटन जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पदाधिकारी राजूभाई रेडीज, मंडल अध्यक्ष विनोद चाळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबीरा दरम्यान १२५ जणांनी सामाजिक बांधिलकी जपत शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. स्वामी समर्थ रक्तपेढी डेरवण यांचे या शिबिराला सहकार्य लाभले. खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके यांनी या शिबिराचे अतिशय चांगले नियोजन केले होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा चिटणीस किशोर आंब्रे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी सरपंच सचिन चाळके, उपाध्यक्ष संकेत हूमणे, पंड्या जाधव, बूथ अध्यक्ष संदेश खराडे, अमित चाळके, सोशल मीडिया प्रमुख रोशन कालेकर, कामगार मोर्चा अध्यक्ष संजय आंब्रे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकार्यांनी विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 26/Sep/2025