रत्नागिरी : बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्यावतीने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराला वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मुंबईतून आलेल्या विविध वैद्यकीय पथकाने सुमारे १ हजार ३००हून अधिक ग्रामस्थांच्या विविध आरोग्य तपासणी केल्या.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद उर्फ बाबू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंडळातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, नेताजी पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, विभागप्रमुख योगेश कल्याणकर यांच्यासह शेकडे कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात डोळे, हाडांची दुखणी यांच्यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. चष्म्यापासून एक्स-रेपर्यंतच्या सुविधा मोफत होत्या. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांच्या पुढील तपासणीचा खर्चही बाबू पाटील मित्रमंडळ करणार आहे. या शिबिरात चार ते पाच लाखांच्या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. रत्नागिरीतील लोकमान्य रुग्णालयाकडून वैद्यकीय पथकाचे नियोजन केले होते. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबिर सुरू होते. १ हजार ३००हून अधिक ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराला भेट देत तपासणी करून घेतली व बाबू पाटील यांचे आभार मानले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यामध्ये बाबू पाटील मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 26-09-2025














