Bihar Government: बिहारच्या बहिणींना मिळणार थेट 10 हजार रुपये!

महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना गाजत असतानाच बिहार सरकारनेही राज्यातील महिलांसाठी ही योजना आणली आहे.
‘महिला रोजगार योजना’ या नावाने ओळखली जाणारी ही नवीन योजना महिलांना आर्थिक बळ देऊन स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू केली जात आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिलांशी संवाद साधतील.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना रोजगार निर्माण करण्याची संधी देऊन त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे हा आहे.

योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख महिलांनी अर्ज केले असून त्यापैकी पात्र ठरलेल्या 75 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात मदतीचा लाभ मिळणार आहे.

पहिल्या हफ्त्यानंतर, लाभार्थी महिलांनी रोजगारासाठी घेतलेली पावले आणि केलेली तयारी यांचा आढावा घेऊन त्यांना 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची तरतूद आहे.

ही आर्थिक मदत महिला शेती, पशुपालन, शिलाई मशीन खरेदी किंवा इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणे सोपे होईल.

संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून, अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असा स्पष्ट शब्दांत सरकारने पुनरुच्चार केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:04 26-09-2025