रत्नागिरी : ‘वुमेन्स कार्निव्हल’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर रत्नागिरी खबरदारने आता रत्नागिरीकरांसाठी आणखी एक खास पर्वणी आणली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात “दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य प्रदर्शन ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड येथे भरणार आहे.
हा शॉपिंग फेस्ट रत्नागिरीतील महिलांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे, कारण यामध्ये त्यांना दिवाळीच्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूची मोठी व्हरायटी एकाच छताखाली मिळणार आहे. यात हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने, पारंपरिक व आधुनिक कपडे, आकर्षक कंदील, सुंदर पणत्या, विविध प्रकारची रांगोळी, मनमोहक परफ्युम्स, आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी वस्तू यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आकर्षक वस्तूंबरोबरच भरघोस डिस्काऊंटचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे खरेदीचा आनंद द्विगुणीत होईल. दिवाळीच्या उत्साहात भर घालणारे हे प्रदर्शन केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंददायी अनुभव असेल.
रत्नागिरी खबरदारने आयोजित केलेल्या या भव्य व्यावसायिक प्रदर्शनातून महिलांना एक मोठे व्यासपीठ मिळणार आहे. तरी, प्रत्येक रत्नागिरीकर कुटुंबाने या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या दिवाळीची खरेदी एकाच ठिकाणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिनांक: ९, १०, ११, १२ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
स्थळ: जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी.














