Mandangad : केळवत घाट संरक्षण भिंतीअभावी बनलाय धोकादायक!

मंडणगड : मंडणगड ते खेड व दापोलीकडे जाणाऱ्या मुख्य राज्यमार्गावर केळवत हा घाट आहे. मागील काही वर्षांत अनेक अपघात या ठिकाणी झाले. या घाटातील सत्ता उत्तम आहे. मात्र, घाटाच्या रुंदीकरण, डागडुजीच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. पाटातील धोकादायक व खूप खोल असलेल्या दरीकडील बाजूच्या ठिकाणी संरक्षण भिंत अथवा मेटल बॅरिकेटस् नसल्याने हा घाट धोकादायक झाला आहे.

या घाटातून बदलत्या काळानुसार वाहतुकीची वाढलेली रहदारी पाहता रस्त्यांबरोबर वाहतुकीसाठी अन्य सुरक्षेच्या बाबींची पूर्तता करणे क्रमप्राप्त ठरते. डोंगराळ व वळणाच्या रस्त्यामुळे पर्यटकांना प्रवास करणे अवघड डोंगराळ आणि वळणावळणाच्या रस्त्यांमुळे बाहेरून येणाग्या पर्यटकांना प्रवास करणे अवघड जाते. अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली पाहिजेत, अवघड वळणांवर संरक्षक भिंती व मेटल बॅरिकेटस्‌को नव्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

अनेक ठिकाणी कोसळून पडेलेल्या भिती व मोडकळीस आलेले बरिकेटस् हे अपघातांचे कारण ठरतात. पुरार-खेड महामार्गावर मंडणगड-दापोली फाटा ते केवळवत असा चार किलोमीटर लांब पल्ल्याना केळवत घाट आहे. या महामार्गावरील मालवाहतूक, प्रवासी वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. दरीकडील बाजूस संरक्षण भिंत, मेटल बॅरिकेटस नसल्याने अपघातजन्य स्थिती संभवते. मोठ्या दोन यू टर्नपैकी केळवतननिक असलेल्या यू टर्नवर अपघात झाल्याची उदाहरणे अनेक आहेत. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण किंवा वठाण कमी करण्याची तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 27/Sep/2025