Khed : भरणेत १ ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिराचे आयोजन

खेड : श्रीदेवी काळकाई मंदिर ट्रस्ट भरणे आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

शिबिराचे उद्घाटन खेडचे आमदार तथा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्याहस्ते होणार आहे. या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदयविकार तपासणी, आयुष्यमान भारत योजनेविषयी मार्गदर्शन तसेच दंत, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग व नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व तपासणी केली जाणार आहे.

या शिबिरात डॉ. सुप्रिया व्यवहारे, डॉ. निखिल मिसाळ, डॉ. समीर मंडपे, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. शिवानी गवई यांच्यासह आरोग्य कर्मचारी नागरिकांची आरोग्य तपासणी करतील. या शिबिरात गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराचे नियोजन नरेश इदाते व सहकारी करत आहेत.

शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना शासकीय प्रमाणपत्रासोबतच ऑक्युलर व्हेईजन टेस्टही मोफत करण्यात येणार आहे. श्रीदेवी काळकाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र भरणे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत खरताडे यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 27/Sep/2025